Agriculture News : शेतकऱ्यांना (Farmers) सक्षम करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेनं अॅमेझॉन किसानसोबत (Amazon Kisan) सामंजस्य करार केला आहे. अधिकाधिक उत्पादन आणि उत्पन्नासाठी विविध पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत, भारतीय कृषी संशोधन परिषद शेतकऱ्यांना अॅमेझॉनच्या नेटवर्कद्वारे तांत्रिकदृष्ट्या प्रोत्साहन प्रदान करेल. यामुळं शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि पीक उत्पादनात वाढ होईल.


ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या ताज्या उत्पादनांची उपलब्धता होणार 


अॅमेझॉन किसान (Amazon Kisan) कार्यक्रमासोबत शेतकऱ्यांच्या भागीदारीतील हा सामंजस्य करार अॅमेझॉन फ्रेशसह संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या ताज्या उत्पादनांची उपलब्धता  सुनिश्चित करण्यात मदत करेल. शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा यासाठी अन्य शेती उत्पादने घेण्यावर भर देणार असल्याचे मत शेतीवर  कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव  आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ हिमांशू पाठक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कृषी आणि हंगाम आधारित पीक योजनांमधील महत्त्वपूर्ण निविष्ठांचे महत्त्व आणि भूमिका अधोरेखित केली. तंत्रज्ञान, क्षमता बांधणी आणि नवीन माहितीचे हस्तांतरण यासाठी आयसीएआर अॅमेझॉन सोबत सहयोग करेल, असे त्यांनी नमूद केले.


शेतकऱ्यांच्या व्यापक समूहाला कृषी विज्ञान केंद्र बळकट करेल


आयसीएआरच्या वतीने,  (कृषी विस्तार) उपमहासंचालक डॉ. यू.एस. गौतम आणि अॅमेझॉन फ्रेश पुरवठा साखळी आणि किसानचे वरिष्ठ उत्पादन प्रमुख सिद्धार्थ टाटा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. व्यापक संशोधनाद्वारे विकसित केलेल्या अचूक कृषी पद्धतींचा विस्तार करण्यासाठी सहकार्याचा आणखी विस्तार करण्यासाठी आयसीएआर-केव्हीके आणि अॅमेझॉन यांच्या वतीने  पुणे येथे सुरू करण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या परिणामांनी प्रोत्साहित केले आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्षमता बांधणी  कार्यक्रमांद्वारे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेतकऱ्यांच्या व्यापक समूहाला कृषी विज्ञान केंद्र बळकट करेल. तसेच कृषी विज्ञान केंद्रांवर इतर शेतकरी संलग्नता कार्यक्रमांवर आयसीएआर आणि अॅमेझॉन  एकत्रितपणे काम करतील. प्रात्यक्षिके, चाचण्या आणि शेती पद्धती आणि शेतीची नफा वाढवण्यासाठी क्षमता बांधणी  उपक्रम आयोजित करतील. याशिवाय, अॅमेझॉन प्रशिक्षण सहाय्य प्रदान करेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचे ऑनलाइन मंचाद्वारे  विपणन करण्यात मदत करेल. यामुळं  ग्राहकांशी थेट संपर्क साधला जाईल. हा सामंजस्य करार अॅमेझॉन फ्रेशसह संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या ताज्या उत्पादनांची उपलब्धता  सुनिश्चित करण्यात मदत करेल. 


महत्त्वाच्या बातम्या:


Kharip Crop MSP: खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ, भात 143, ज्वारी 235 तर मूग आणि तिळाच्या हमीभावात 800 रुपयांची वाढ जाहीर