Goat Farming : शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय (Dairy Farming) केला जातो. या माध्यामातून शेतकरी (Farmers) चांगले उत्पन्न मिळवू शकतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी सातत्यानं वाढत आहे. मागणी वाढत असताना पुरवाठा मात्र कमी होताना दिसत आहे. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध व्यावसायाकडे वळत आहेत. गायी म्हशींसोबतच शेळीपालन (Goat Farming ) करण्याकडे देखील शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे. शेळी पालनातून देखील तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेळीपालनातून चांगला आधार मिळू शकतो. 


शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे बघितले जाते. या माध्यमातून शेतकरी चांगला फायदा मिळवू शकतात. शेळीपालनातून योग्य नफा मिळवायचा असेल तर त्यांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मोठमोठ्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची आवश्यकता असते. पण शेळ्यांच्या बाबतीत जनवरांच्या तुलनेत त्यांना चारा कमी लागतो. त्यामुळं शेळीपालनाचा खर्च कमी असल्याची माहिती पशुसंवर्धन तज्ज्ञांनी सांगितली. शेळी कधीही एकाच वेळी चारा खात नाही. दिवसातून चार पाच वेळा शेळ्यांना चारा द्यावा लागतो. तसेच शेळ्या पाणी देखील एकाच वेळी पीत नाहीत. त्यामुळं त्याच्या पालनाचा जास्त खर्च येत नाही.


बंदिस्त शेळीपालन करताना विशेष काळजी 


शेळ्या विविध झाडांची पाने आणि गवत खाऊन पोट भरु शकतात. मात्र, व्यावसायिक दृष्टीनं बंदिस्त शेळीपालन करणारे लोक विशेष व्यवस्था करतात. ते शेळ्यांना दिवसभरात तीन प्रकारचे अन्न देताता. एक म्हणजे हिरवा चारा, दुसरा कोरडा चारा आणि तिसरा म्हणजे विशेष पोषक द्रव्ये असलेले धान्य. या तीन प्रकारचा चारा देण्याबरोबरच शेळ्यांची भूक आणि पचनशक्तीही वेळोवेळी तपासावी लागते.


तुम्ही किती शेळ्या पाळू शकता


जर तुम्ही वैयक्तिक गरजांसाठी शेळ्या पाळत असाल तर 5 शेळ्या पुरेशा आहेत. या शेळ्या तुम्ही घराच्या अंगणात शेड टाकून पाळू शकता. परंतु व्यावसायिक शेळी पालनामध्ये सुमारे 100 शेळ्या पाळल्या जाऊ शकतात. शेळ्यांना एकाच जागी बसणे अजिबात आवडत नाही. त्यांना भटकंतीची आवड असते. त्यामुळं शेळीपालनातील वातावरण मोकळे आणि जमीन अधिक असावी.


शेळीपालन दुधासाठी की मांसासाठी 


शेळ्यांची जात निवडणे खूप महत्वाचे आहे. कारण तुम्ही दुधासाठी शेळीपालन करता की मांसासाठी शेळीपालन करता यावर शेळीची जात निवडणे गरेचं आहे. कारण दूध देणाऱ्या शेळ्यांचा आहारही खूप चांगला असणं गरजेचं आहे. 1 लिटर दूध देणाऱ्या शेळीला दररोज 300 ग्रॅम धान्य द्यावे लागेल, तेही दिवसातून दोनदा. याशिवाय हिरवा चारा आणि सुका चारा मिसळून सुमारे चार किलो आहार शेळीला दररोज द्यावा लागेल. हिवाळ्यात शेळ्या क्वचितच पाणी पितात, परंतु उन्हाळ्यात 700 ते 800 मिली पाणी शेळ्यांना द्यावे लागते. ज्यामुळं या जनावरांची पचनक्रिया बरोबर होते.


गाभण शेळ्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं


कोणत्याही डेअरी फार्मचे भविष्य म्हणजे शेळ्यांच्या आरोग्यावर अवलंबून असते.  शेळ्या ज्या कोकरांना जन्म देतात त्यांचेही आरोग्य ठिक असणं गरजेच असते. नवीन कोकरू आल्यावर ते शेळीपालनाचा नफाही वाढतो. त्यामुळं गाभण शेळ्यांची थोडी वेगळी काळजी घ्यावी लागते. गाभण शेळ्यांसाठी वेगळे शेड तयार करणे सोयीस्कर ठरेल. जेणेकरून गाभण शेळीला इतर शेळ्यांच्या उड्या मारताना कोणतीही अडचण येऊ नये. गाभण शेळीच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.


महत्त्वाच्या बातम्या:


Dairy Business : दिलासादायक! दुग्ध व्यवसायासाठी 50 लाख शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान : मंत्री डॉ. संजीव बल्यान