Agriculture News : राज्यतील विविध भागाला अवकाळी पावसानं (Unseasonal rain) झोडपून काढलं आहे. तसेच अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळं शेतात उभी असलेली पिकं आडवी झाली आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात वादळी झालेल्या अवकाळी पावसानं केळीच्या बागा (Banana Crop) जमीनदोस्त झाल्या आहेत. बागा काढणीला आल्या होत्या. मात्र या अवकाळी पावसामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर दुसरीकडं यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात 400 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान
हिंगोली जिल्ह्याल जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. काल झालेल्या झालेल्या पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळं केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अवघ्या 20 मिनिटे झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचे स्वप्न उध्दवस्त झाले आहे. केळी काढणीला आलेली असताना अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसानं मातीमोल झाला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे देखील अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. या पावसामुळं 400 हेक्टरवरील फळबागा, पालेभाज्या, उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि सर्वे हे केवळ एक शासकीय सोपस्कार तर होत नाही नाही ना? असा देखील सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
राज्यातील विविध भागात अवकाळीची पावसाची हजेरी
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक ठिकाणा गारपीट देखील होत आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. दरम्यान, काल राज्यातील, बुलढणा, यवतमाळ, हिंगोली, जालना, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, परभणी या जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: