Agriculture News : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रब्बी हंगामातील (Rabi Season) ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू राहणार आहेत. कोकणातील आंबा, काजू, संत्रा, रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरुन योजनेत सहभागी व्हावं, धनंजय मुंडेंचं आवाहन
फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर होती. मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळं पीकविमा भरू शकले नाहीत, याचा विचार करून केंद्राकडे विनंती केली होती. त्यानंतर यामध्ये वाढ करण्यात आली असून दिनांक 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवसात वरील पिकांचा विमा भरता येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरुन या योजनेत सहभागी व्हावं असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
मुदतवाढ मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा
पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले होते. मात्र, आता मुदत वाढ मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. आता दिनांक चार व पाच डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त (वाढीव ) दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासनाने हवामानावर आधारित फळपिक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत आंबा, काजू, केळी या फळ पिकांचा समावेश आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Wardha News : कंपन्या बांधावर येत नसेल तर विमा मिळणार कसा? शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत