Clove Farming : देशातील शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं विविध संकट येत आहेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी. या संकटांचा सामना करत काही ठिकाणी शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. पारंपारिक पिकांना बगल देत शेतकरी सध्या वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेत आहेत. सध्या देशातील अनेक शेतकरी लवंग शेती (Clove Farming) करत आहेत. ही लंवग शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. लवंगेला सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळं या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
Clove : मागणी वाढल्यामुळं लवंग दरात वाढ
जेवण तयार करताना लवंगेचा वापर केला जातो. तसेच विविध प्रकराची आयुर्वेदीक औषधं तयार करताना देखील लवंगेचा वापर केला जातो. त्यामुळं देशभरात लवंगेला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळं चांगले दरही मिळत आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळं शेतकरी लंवग पिकाची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
Clove farming benefits : लवंग पिकाचे फायदे
हिवाळ्यात लवंग खाल्ल्याने सर्दी, डोकेदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्याचबरोबर लवंगीपासून बनवलेली टूथपेस्ट आता बाजारात आली आहे. लवंगापासून अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधे देखील बनवली जातात. याशिवाय लवंगापासून सौंदर्य उत्पादनेही बनवली जात आहेत. त्यामुळं बाजारपेठेत लवंगेला मोठी मागणी आहे.
उष्ण हवामान असलेल्या भागात लंवग पिकाचं उत्पादन घेतलं जात
लवंगेचे पिक हे उष्ण हवामान असलेल्या भागात घेतले जाते. या पिकाची झाडे 30 ते 35 अंश तापमानात वेगाने वाढतात. म्हणूनच महाराष्ट्रातील कोकण भागात ते जास्त घेतले जाते. लवंगाचे रोप लावायचे असेल तर त्याच्या बिया एक दिवस आधी पाण्यात भिजवाव्या. त्यानंतर बियांच्या वरची साल काढून बिया पेरल्या जातात.
50 झाडांमधून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो
लवंग शेतीसाठी नेहमी सेंद्रिय खतांचाच वापर करावा. लवंग द्राक्षांप्रमाणे गुच्छांमध्ये वाढतात. त्याचा रंग लाल आणि गुलाबी आहे. एका झाडापासून 2 ते 3 किलोपर्यंत लवंगा तयार होतात. जर शेतकरी बांधवाने आपल्या शेतात सुमारे 50 रोपे लावली तर त्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. लवंगेला सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळं या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: