Vegetable Farming : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मग ते क्षेत्र कोणतही असो, अगदी संरक्षण दलापासून ते उद्योग, व्यवसाय राजकाराण, समाजकारण, शेती या सर्व क्षेत्रात महिला उत्तम प्रकारचे काम करताना दिसत आहेत. अशात एका धाडसी महिलेनं आपल्या शेतात (female farmers) वेगवेगळे प्रयोग केले आहेत. या माध्यमातून या महिलेनं चांगल उत्पन्न घेतलं आहे. बिहारमधील बेगुसराय येथील एका महिला शेतकऱ्याने दोन एकर जमिनीत 11 प्रकारच्या भाजीपाल्याची शेती (Vegetable Farming) केली आहे. ही महिला दर आठवड्याला 15 हजार रुपये मिळवत आहे. म्हणजे वर्षाला सरासरी सात लाख रुपयांचे उत्पन्न ही महिला घेत आहे.


आपल्या मेहनतीच्या बळावर बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील अनेक महिलांनी उत्तम प्रकारची शेती केली आहे. या महिलांमध्ये गंगेच्या काठावर वसलेल्या मटिहानी गावातील रहिवासी कुमकुम देवी यांचाही समावेश आहे. त्यांनी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी दियारा परिसरात शेती करत आहेत. गेल्या 11 वर्षांपासून अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड केल्यामुळं त्या सध्या चर्चेत आहेत.


बेगुसराय जिल्हा मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर मटिहानी ब्लॉकमध्ये कुमकुम देवी शेती करतात. 39 वर्षीय कुमकुम देवी यांनी हिरव्या भाज्या आणि केळी हे उत्पन्नाचे साधन बनवले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे त्यांनी सांगितले. पतीलाही पारंपारिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. मुलांना शिकवायला पैसे नव्हते. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या काही महिलांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून उपलब्ध केळीच्या पिकासंदर्भात माहिती घेतली. तेव्हापासून त्या आपल्या अर्धा एकर जमिनीत केळीची बाग लावली. यासोबतच वांगी, कोबी, भेंडी, टोमॅटो, मुळा, लिंबू, हिरवी मिरची, अशा एकूण 11 भाजीपाला पिकांची लागवड त्यांनी केली आहे.


शेतीमुळे आर्थिक परिस्थिती बदलली


कुमकुम देवी यांनी सांगितले की, केळी पिकातून चांगले पैसे मिळतात. तसेच भाजीपाल्याचे उत्पादनही चांगले होते. दर आठवड्याला आम्ही 10 ते 15 हजार रुपयांचा भाजीपाला बाजारात विकतो. त्याच वेळी, कमाईतून कर्ज देखील हळूहळू फेडले जात आहे. शेतीतूनच कुटुंबाची आर्थिक स्थिती बदलली असल्याची माहिती खुद्द कुमकुम देवी यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्या, कमी व्याजदरात एवढ्या लाखांचं कर्ज मिळवा; जाणून घ्या प्रक्रिया