Beed News : राज्याच्या बहुतांश भागा पावसानं (Rain) दडी मारली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसला आहे. काही भागात खरीपाची पिकं (Kharip Crop) वाया गेली आहेत, तर काही भागात पिंक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. बीड (Beed) जिल्ह्याला देखील कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. कृषी विभागानं याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला आहे. 


बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यात फक्त 21 दिवसच पाऊस


बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यात फक्त 21 दिवसच  पाऊस पडल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीनसह कापूस, तूर यासह अन्य पिकाच्या उत्पादनामध्ये 50 टक्क्यांची घट होणार आहे. पाऊस नसल्यानं बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम हा धोक्यात सापडला असून, खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. त्याचबरोबर कापूस सोयाबीन उडीद मूग तूर आणि भुईमूग या सर्वच पिकाच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट येण्याची शक्यता बीडच्या कृषी विभागांने वर्तवली आहे. या संदर्भातला एक अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.


90 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक पावसाअभावी नष्ट 


बीड जिल्ह्यामध्ये 90 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक पावसाअभावी नष्ट झालं असून पिक विमा कंपनीकडून सोयाबीन मूग आणि उडीद या पिकासाठी 25 टक्के अग्रीम पिक विमा मंजूर झाला आहे. मात्र, दुसरीकडं मंजूर झालेला पिक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर बीड जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाल्यानं हवामान विभागानं बीड जिल्हा आता रेड झोनमध्ये असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळं एकीकडे पिकाच्या उत्पादनामध्ये होत असलेली घट तर दुसरीकडे जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आता चिंतेचा विषय ठरत आहे.


राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये


राज्यात पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सर्वत्र चांगला झाला नाही. कोकण आणि गोव्याचा काही भाग, तसेच ठाणे आणि नांदेड जिल्हा सोडल्यास इतर ठिकाणी पाऊस सरासरी इतका आहे. तसेच राज्यातील 13 जिल्ह्यात तर सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे. ज्यात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव,सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती या जिल्ह्यात सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस झाला असून, त्यांच्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे हे तेराही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashra Drought : दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश