Agriculture news : आज भारतातून (India) जगभरात अनेक वस्तूंची निर्यात होत आहे. मात्र जर तुम्ही या पदार्थाची शेती केली, तर तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो. कारण अवघ्या भारतात याची मागणी झपाट्याने वाढत आहेत. अनेक शेतकऱ्यांना (Farmers) याची शेती करून आर्थिकरित्या फायदा होत आहे. जाणून घ्या



शेतकरी 'या' पिकातून मोठा नफाही कमावत आहेत.
भारतातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून शेतकरी या पिकातून मोठा नफाही कमावत आहेत. रताळे (Sweet Potato) त्यापैकीच एक. बटाट्यासारखा दिसणारा रताळा भारतासह जगभरात आवडीचा आहे. रताळे निर्यातदारांच्या यादीत जगभरात भारत सहाव्या क्रमांकावर आहे, शेतकरी ज्या प्रकारे याच्या लागवडीसाठी आग्रही आहेत, तो दिवस दूर नाही. जेव्हा आपण चीनला मागे टाकून निर्यातदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असू. जाणून घ्या, रताळ्याची लागवड करून सामान्य पिकांपेक्षा अधिक पैसे कसे कमवू शकतो?


रताळ्याची लागवड कशी करावी?


रताळ्याची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जमिनीची माती ओळखावी लागेल. जर तुमच्या जमिनीची माती खूप कठीण आणि खडकाळ असेल, किंवा तुमच्या शेतात पाणी साचण्याची समस्या असेल तर रताळ्याची लागवड करणे तुमच्यासाठी योग्य नाही. जर तुमच्या शेतातील मातीचे pH मूल्य 5.8 ते 6.8 दरम्यान असेल तर तुम्ही रताळ्याची लागवड अगदी आरामात करू शकता. रताळ्याची लागवड करताना सिंचनाची खूप काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही उन्हाळ्यात त्याची रोपे लावली असतील, तर लावणीनंतर लगेच पाणी देऊ नये. आठवड्यातून एकदाच पाणी देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पावसाळ्यात रताळ्याची लागवड केली असेल, तर त्याला सिंचनाची गरज भासणार नाही.


कोणत्या प्रकारचे खत वापराल?
आजच्या काळात तुम्ही कोणतेही पीक घेत असाल, तर तुम्ही तुमच्या शेतात कोणते खत कधी वापरले यावरही तुमच्या पिकाचे उत्पन्न अवलंबून असते. जर तुम्ही रताळ्याचे पीक घेत असाल तर तुम्ही तुमच्या शेतात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअमचा वापर करावा. जर तुमची माती जास्त आम्लयुक्त असेल, तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट आणि बोरॉन वापरावे. तुम्ही तुमच्या जमिनीनुसार या खतांची मात्रा कृषी तज्ज्ञांना विचारून निवडू शकता.


उत्पन्न काय असेल?


शेतकरी जे पीक घेतात, त्यांचे उत्पादन काय असेल? त्यांना त्यांच्या खर्चानुसार नफा मिळेल का? हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. रताळ्याबद्दल बोलायचे झाले, तर यात शेतकरी जास्त नफा मिळवतो. एका हेक्टरमध्ये सुमारे 25 टन रताळ्याचे उत्पादन होते. 10 रुपये किलोने जरी रताळी विक्रीस ठेवली, तरी शेतकऱ्याला एक एकरातून किमान 1.25 लाख रुपये मिळतील.


 


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा