Alphonso Mango : आज अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया. आज शुभ मुहूर्त असल्यानं लोकांकडून आंबा (Mango) खरेदीला महत्व दिले जाते. त्यामुळं आज सकाळपासूनच नवी मुंबईच्या एपीएमसी (Mumbai APMC) फळ मार्केटमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अक्षय तृतीया बरोबर रमजान ईदही आल्याने आंबा खरेदीत वाढ झाली आहे.


हापूस आंब्याला डझनला 500 ते 800 रुपयांचा दर 


आज अक्षय तृतीया शुभ मुहूर्त असल्यानं लोकांकडून आंबा खरेदीला महत्व दिलं जात आहे. आंबा घेण्यासाठी सकाळीच लोक फळ मार्केटमध्ये आले आहेत. मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या आंबा महाग मिळत आहे. सद्या एपीएमसीमध्ये 60 ते 65 हजार आंबा पेटी येत आहे. यामध्ये कोकणातील हापूसच्या फक्त 15 ते 18 हजार पेट्या येत आहेत. राहिलेला आंबा दक्षिण भारतातून आवक होत आहे. कोकणातील हापूस कमी येत असल्यानं दरही वाढले आहेत. सद्या 500 ते 800 रुपये डझन हापूस आंबा विकला जात आहे.


आंबे खूप महाग आहेत. 600 ते 700 डझन आंबे मिळत आहेत. आज ईद आणि अक्षय्य तृतीय आहे, त्यामुळं आंबे खरेदी करण्यासाठी आम्ही आलो असल्याची माहिती ग्राहकांनी दिली. आज अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच वेळी आल्यानं आंब्याला बाजारात मोठा मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोकणातून सध्या कमी आंबा बाजारात आला आहे. लोकांची हापूस आंब्याला जास्त मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्या व्यापारी ज्या किंमतीला आंब्याची वित्री करतात, त्याच प्रमाणात दर शेतकऱ्यांनी देखील मिळाला पाहिजे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.


अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा आंबा पिकाला फटका


सध्या देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका आहे तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच देशातील काही भागात अवकाळी पावासानंही (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आंबा पिकाला (Mango Crop) मोठा फटका बसला आहे. देशातील ओडिशा, उत्तर प्रदेश महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आंबा पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी उत्पादनातही घट झाली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Mango Farming : अवकाळी पावसाचा फळांच्या राजाला फटका, देशातील आंबा उत्पादक संकटात; यूपीसह या राज्यात मोठं नुकसान