Yavatmal Rain : विदर्भात सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांना या पावासाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही या मुसळधार पावासाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं पिकांच मोठं नुकसान झालं आहे. पैनगंगा नदीच्या पुरामुळं जवळपास 20 ते 22 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. या दोन तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे करणार आहेत.


मुसळधार पावासाचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांची उभी पिकं पावसाच्या पाण्यात आहेत. जवळपास 20 ते 22 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. तेथील शेती पाण्यात गेली आहे. या दोन तालुक्यांची जिल्हाधिकारी आज पाहणी दौरा करणार आहे. यावेळी ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. 


मराठवाडा विदर्भ मुसळधार पाऊस


मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 48 तासापासून बुलढाणा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पावसाचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. संततधार सुरु असलेल्या पावसानं सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पिकं कुजण्याची भीती व्यक्त होत आहे. अद्यापही शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळं आणि कमी पावसानं विदर्भातील शेतकरी शक्यतो कमी पावसात येणारी किंवा कमी दिवसात येणारी सोयाबीन सारखी पिके खरीप हंगामात घेत असतात. सोयाबीन हे कमी पाण्यात आणि 90 ते 110 दिवसात येणारी पीकं आहेत. पण यावर्षी नुकतीच पेरणी केलेलं सोयाबीन चांगलं उगवलेली असताना मात्र आता गेल्या 48 तासापासून सुरु असलेल्या पावसानं ही कोवळी पिकं आता सडण्याच्या कुजण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याखाली शेकडो हेक्टरवरील पिकं गेली आहेत.  यामुळं मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 


महत्वाच्या बातम्या: