Apple WWDC 2022 : Apple च्या वार्षिक वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) इव्हेंटला सोमवारी रात्री उशिरा सुरुवात झाली. यादरम्यान अॅपलनं आयफोनसाठी युजर्ससाठी खुशखबर देत iOS 16 सादर केला. कंपनीकडून iOS 16 मध्ये अनेक छोटे-मोठे बदल करण्यात आलं आहे.
iOS 16 नुसार, iPhone मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या लॉक स्क्रीनमध्ये करण्यात आला आहे. याअंतर्गत ग्राहकांना iPhone च्या होम स्क्रीनवर वॉलपेपर बदलण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना आता त्यांच्या iPhone मध्ये नोटिफिकेशन्स अरेंजही करता येणार आहेत.
तुम्हाला Smart Home मध्येही बदल पाहायला मिळतील. नवीन कॅटेगरी, लेआउटसह आयओएस सादर केलं जाईल. CarPlay साठी अपडेट देखील देण्यात आलं आहे. कार प्लेचं नवं व्हर्जन सर्व व्हेइकल कंट्रोलला सपोर्ट करणार आहे.
नोटिफिकेशनमध्ये बदल
iPhone यूजर्ससाठी सादर करण्यात आलेल्या iOS 16 मध्ये Live Activities नावाचं एक नवीन स्टाइलचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. याद्वारे युजर्स त्यांच्या वर्कआउट्सशी संबंधित माहिती, तसेच लाईव्ह इव्हेंट्ससोबतच, कॅब राइड्सव्यतिरिक्त इतर अॅक्टिव्हिटींची माहिती मिळत राहील. सध्या, iOS 16 अंतर्गत लॉक स्क्रीनच्या बॉटममध्ये सूचना ठेवल्या जातात.
Apple Pay Later सुविधा
अॅपल डेव्हलपर्स कॉन्फरन्स दरम्यान अॅपल पे लेटर (Apple Pay Later) आणि स्प्लिट द कॉस्ट (Split the Cost) देखील सुरू करण्यात येत आहे. विशिष्ट कालावधीनंतर पेमेंट केलं जाऊ शकतं, ज्या अंतर्गत कंपनी कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. याशिवाय टीव्ही शो, म्युझिक ऐकणं किंवा फिटनेस+ हे मित्रांसह सहज शेअर करता येणार आहे.
iMessages एडिट करण्याची सुविधा
अॅपलनं ग्राहकांना त्यांचे iMessages एडिट करण्याची सुविधा दिली आहे. Apple च्या मेसेजिंग अॅपमध्ये (Apple) तीन मोठे फिचर्स जोडण्यात आले आहेत. या सुविधेअंतर्गत, ग्राहक iMessage द्वारे पाठवलेला कोणताही संदेश संपादित करू शकतो किंवा रिकॉल करू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Apple WWDC 2022 : दमदार फिचर्सची पर्वणी; अॅपलकडून M2 प्रोसेसरसह नवा MacBook Air लॉन्च