...म्हणून ओबामांची मुलगी रेस्टॉरंटमधील टेबल साफ करते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामांनी आपल्या दोन्ही मुलांचे पालन-पोषण अतिशय सामान्य पद्धतीनेच केले आहे.
नताशा, नॅसीज रेस्टॉरंटच्या नियमांनुसार, निळ्या रंगाचा टीशर्ट आणि कॅप परिधान करून काम करते.
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मुलगी एका रेस्टॉरंटमधील टेबल साफ करते आहे.
वास्तविक, नताशा सध्या या रेस्टॉरंटमध्ये समर जॉब करत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, नताशा ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत आहे, तिथे सहा लोक तिची मदत करत आहेत. पण नताशाची मदत करणारे हे सहाहीजण सुरक्षा संस्थेचे एजंन्ट आहेत. नताशाच्या सुरक्षेसाठी या सहाजणांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण ते नताशाच्या कोणत्याही कामात ढवळाढवळ करत नसल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये नमुद केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलगी नताशा ओबामा सध्या बॉस्टनमधील नॅसीज नवाच्या रेस्टॉरंटमध्ये टेबल साफ करताना पाहायला मिळत आहे.