चुलत भाऊ, चुलत बहिण, सेलिब्रेटींच नात्यागोत्यातच लग्न
सगळ्यात पहिला माहिती घेऊ पाकिस्तान क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीची. याने आपल्याच चुलत बहिणीशीच लग्न केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानच्या टिव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री शाइस्ता लोधी हिनेही आपला भाऊ बिझनेसमन अदनानसोबत लग्न केले आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर सईद अनवर यानेही आपली चुलत बहिण लुबानाशी लग्न केले आहे.
दिवंगत प्रसिद्ध सूफी गायक उस्ताद नुरसत फतेह आली खाँ यांनीही आपली चुलत बहिण नाहिद यांच्याशी लग्न केले होते. नुरसत यांचा पुतण्या राहत फतेह आली खाँ हे सध्या बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक आहेत.
आजही आपल्या समाजात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची लग्ने लावण्यास आक्षेप आहे. हिंदू धर्मात तर अशा परंपरेला कोणतेही स्थान नाही, तर दुसरीकडे युरोपात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या लग्नाला बंदी आहे. अमेरिकेतील 52 पैकी 24 राज्यांध्ये कुटुंबातील भाऊ-बहिणीच्या लग्नाला बंदी आहे.
क्रिकेटसोबतच पाकिस्तानमधील राजकीय क्षेत्रात स्वत:च अस्तित्व निर्माण केलेल्या इमरान खान आणि रेहान खान यांच लग्न पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय राहिला आहे. या दोघांच्या घटस्फोटाचा विषय मीडियाने सर्वात जास्त प्रसिद्धी दिली. रेहानने याच्या आधी आपला चुलत भाऊ एजाज उल रेहमानसोबत लग्न केले होते.
पण मुस्लीम समाजात ही परंपरा रूढ आहे. दक्षिण भारतातील मल्ल्याळम हिंदू समाजात मामा-भाचीचे लग्न लावण्याची परंपरा आहे. आपला शेजारी पाकिस्तानमध्ये अनेक सेलिब्रेटी असे आहेत, ज्यांनी आपल्याच कुटुंबामधील मुलीशी लग्न केले आहे.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेता बाबर खान याने आपल्या पहिल्या पत्नीचे 2014 मधील रस्ते अपघातात निधन झाल्यानंतर, 2015 मध्ये आपली चुलत बहिण बिस्मा खान हिच्याशी लग्न केले. लग्नावेळी ती नववीत शिकत होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -