वीज पडून 300 हून अधिक हरणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2016 09:11 AM (IST)
1
वातावरण बदलामुळे हजारो हरणांचे कळप स्थालांतरीत होऊन, या उद्यानातील टेकड्यांवर दाखल होतात. त्यांना पाहण्यासाठी देशो-विदेशातील पर्यटक या काळात येत असतात. मात्र, या हरण्यांच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींमध्ये शोककळा पसरलेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दक्षिण नॉर्वेमधील Hardangervidda राष्ट्रीय उद्यान हे पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या उद्यानाला हजारो पर्यटक आणि प्राणीमित्र भेट देत असतात.
3
Hardangervidda राष्ट्रीय उद्यानातील एका टेकडीवर गेल्या शुक्रवारी मुसळधार पावसावेळी वीज पडून 323 हरणांचा मृत्यू झाला. यामध्ये 70 पाडसांचा समावेश आहे.
4
युरोपच्या नॉर्वेमधील अॅवॉरमेंट वृत्तसंस्थेने Hardangervidda राष्ट्रीय उद्यानातील हे फोटो सोमवारी प्रकाशित केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -