स्वित्झर्लंडने शनिवारी जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेनचा विक्रम केला.
आल्प्स पर्वतरांगांमध्ये धावणाऱ्या या ट्रेनमध्ये चक्क 100 डबे होते. या ट्रेनची लांबी सुमारे दोन किमी आहे.
स्वित्झर्लंड येथे रेल्वेच्या 175 व्या वर्धापनदिनानिमित्त रॅटियन रेल्वे (RhB) ने घोषित केले की, त्यांनी जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेनचा जागतिक विक्रम मोडला आहे.
ही ट्रेन 1910 मीटर आहे. ट्रेन 25 स्वतंत्र मल्टी-युनिट ट्रेन्स तसेच 100 डब्यांपासून बनलेली आहे.
स्वित्झर्लंडची 100 डब्यांची ट्रेन जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन ठरली आहे.
युरोपच्या Rhaetian रेल्वे कंपनीने 100 कोच असलेली 1.9 किलोमीटर लांब (सुमारे 1.2 मैल लांब) ट्रेन चालवली.
या ट्रेनचा मार्ग 22 बोगद्यांमधून जातो, त्यापैकी काही पर्वत आणि 48 पुलांवरून जातो, ज्यात वळणदार लँडवॉसर व्हायाडक्टचा समावेश आहे.
हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागल्याचे सांगण्यात येत आहे.
ही ट्रेन पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. हे लोक आल्प्समधून सुमारे 25 किलोमीटर रांगेत उभे होते.