आकाशात कार उडवण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलं असेल, पण येत्या काळात तुमचं हे स्वप्नही पूर्ण होणार आहे. चीनी तंत्रज्ञान (China) आणि इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Xpeng ने दुबईमध्ये आपल्या फ्लाइंग टॅक्सीची चाचणी केली आहे. चाचणी दरम्यान, कंपनीने आपल्या X2 फ्लाइंग कारचे पहिले यशस्वी उड्डाण केले. प्रवास आणि सार्वजनिक वाहतुकीच्या विकासात आपण ही एक मोठी संधी मानू शकतो. चीनमधील ग्वांगझू येथील XPeng Inc. च्या विमान संलग्न कंपनीने विकसित केलेली XPeng X2 कार ही जगभरातील उडणाऱ्या कार प्रकल्पांपैकी एक आहे. उडणारी कार बनविणाऱ्या चीनी कंपनीने प्रथम दुबई शहर निवडले, दुबई हे जगातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शहर आहे. X2 फ्लाइंग टॅक्सीच्या चाचणीदरम्यान काही लोकांना त्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर फ्लाइंग टॅक्सीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.