प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता कपूर आज टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि ओटीटीची राणी बनली आहे. निर्माती आणि दिग्दर्शिका असणारी एकता कपूर, मनोरंजन क्षेत्रात 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहे. एकता कपूर आज (7 जून) आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ टीव्हीच नाही, तर बॉलिवूडमध्येही तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे एकता कपूर ही ज्येष्ठ चित्रपट अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी आहे. एकताचा जन्म 7 जून 1975 रोजी झाला. तिचा धाकटा भाऊ तुषार कपूर चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे एकताने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. इथूनच तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. याकाळात तिने निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यात तिला अपयश आले. पहिल्या अपयशानंतर, एकताने तिच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र्य निर्माती बनण्याचा निर्णय घेतला. मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने तिला 2020मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.