आजच्या काळात महिला केवळ घरच नाही तर बाहेरचे जगही उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. (Photo credit: Unsplash)
महिलांच्या डोक्यावर एक नाही तर अनेक जबाबदाऱ्या असतात.(Photo credit: Unsplash)
कुटुंबाची काळजी घेणे, मुलांची काळजी घेणे, करियर करणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे.(Photo credit: Unsplash)
मात्र या सगळ्यात महिलांना स्वत:साठी वेळ काढता येत नाही आणि याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो.(Photo credit: Unsplash)
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी निरोगी राहणे हे अधिक कठीण काम आहे.(Photo credit: Unsplash)
तुमच्या आरोग्यासाठी वेळ काढणे तुम्हाला अवघड जात असेल तर ह्या टिप्स फॉलो करा.(Photo credit: Unsplash)
स्वतःला हायड्रेटेड ठेवा :ऑफीसमध्ये काम करताना महिला अनेकदा कामात अडकून वेळेवर पाणी पिण्यास विसरतात (Photo credit: Unsplash)
पोटभर नाश्ता करा :वर्किंग वुमनही अनेकदा ही चूक करतात. घरातील सर्व कामे उरकून, रिकाम्या पोटी ऑफिसला जातात आणि मग लगेच जेवण करतात.(Photo credit: Unsplash)
वॉक करा: ऑफिस आणि घरातील कामामुळे योगासन किंवा व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर चालत जा. (Photo credit: Unsplash)
फळे खा:अनेकदा घर आणि ऑफिस सांभाळताना महिलांना योग्य आहार घेता येत नाही. त्यासाठी वेळ भेटल्यास फळे खा (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo credit: Unsplash)