भारतीय संगीतकार रिकी केज यांचं ग्रॅमी पुरस्कारासोबत खास नातं आहे.

भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रिकी केज यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे.

रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर मोहर उमटवल्याने भारतीय संगीतप्रेमी आनंदी झाले आहेत.

रिकी केज हे भारतातील एक लोकप्रिय संगीतकार आहेत.

रिकी यांनी आजवर 20 पेक्षा जास्त देशांमधील 100 पुरस्कांरांपेक्षा अधिक पुरस्कार जिंकले आहेत.

भारताचा युवा आयकॉन म्हणूनदेखील रिकी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

रिकी यांनी आता ग्रॅमी पुरस्काराच्या माध्यमातून देशाचे नाव जगात रोशन केले आहे. 

ग्रॅमी पुरस्कार पटकावल्यानंतर रिकी केज यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

रिकी केज यांनी ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,कृतज्ञता व्यक्त करतो. माझा तिसरा ग्रॅमी पुरस्कार.