गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले असून आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी लता दीदींनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

लता दीदींनी 'किट्टी हसल' या मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणं गायलं होतं.

लता दीदी यांना पद्मभूषण (1969), पद्ममविभूषण (1999), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

लता मंगेशकर यांनी 'सौगंध मुझे इस मिट्टी की' हे गाणे शेवटचे गायले आहे.

भारतातील 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांना 2001 साली 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लतादीदींच्या दैवी सुरांनी भारतीय संगीताला जगभरात ओळख मिळवून दिली आहे.

संगीतविश्वात पाऊल ठेवणाऱ्या कलाकारांसाठी आणि भावी पिढीसाठी लता मंगेशकर या आदर्श आहेत.