वरून शांत दिसणाऱ्या पृथ्वीच्या गर्भात नेहमी उलथापालथ होत असते.

पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे भूकंप होतो.

जगभरातील भूकंप मापन केंद्र दरवर्षी भूकंपाचे साधारण 20 हजार झटके नोंदवतात.

असं मानलं जातं की पृथ्वीवर दरवर्षी भूकंपाचे लाखो झटके बसतात.

मानवाच्या कृत्यांमुळे भूकंप होतात असे समोर आले आहे.

एखाद्या भागामध्ये झालेला भूकंप नैसर्गिक कारणांमुळे झाला की,

यामागे कोणत्या औद्योगिक घडामोडी होत्या, याचा शोध हे वैज्ञानिक घेत असतात.

तेलाच्या शोधासाठी ठिकठिकाणी पृथ्वीला जखमी केलं जातंय.

यामुळे पृथ्वीच्या आतमध्ये खोलवर असणाऱ्या खडकांचं संतुलन बिघडतंय.

पण, जेव्हा खोलवर ड्रिलिंग केलं जातं तेव्हा हे थर उद्ध्वस्त होतात आणि त्यांच्यातली ऊर्जा मोकळी झाल्याने भूकंप होतात.