अभिनेत्री विशाखा सुभेदारने छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं आहे.

'शुभविवाह' या मालिकेत विशाखा सुभेदार रागिणी आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

'शुभविवाह' मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून या नव्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.

'शुभविवाह' मालिकेतील रागिणी आत्या या पात्राविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाली, ‘रागिणी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे.

विशाखा सुभेदार पुढे म्हणाली,मालिकेच्या निमित्ताने एखादं पात्र जगायला मिळणं आणि त्या पात्रानुसार बदलणाऱ्या भावभावना साकारणं एक कलाकार म्हणून आनंददायी आहे.

विशाखा म्हणाली,प्रत्येक सीनसाठी रागिणी हे पात्र कसं व्यक्त होईल याचा विचार करावा लागतो.

'शुभविवाह' ही मालिका 16 जानेवारीपासून दुपारी 2 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेच्या माध्यमातून विशाखा सुभादारने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

विशाखा सुभेदारने तिच्या विनोदी अभिनयाने 'फू बाई फू', 'बुलेट ट्रेन' आणि 'हास्यजत्रा' या कार्यक्रमांच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवला आहे.

विशाखाला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.