विजय आणि समंथा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 'खुशी' चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'खुशी' या चित्रपटाचं पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे काश्मिर येथे झाले आहे. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथा चर्चेत आली. पुष्पा या चित्रपटातील आयटम सॉंगमुळे ती घराघरात पोहोचली. समंथा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी फोटो शेअर करते. तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात. समंथा ही सर्वाधिक मानधन घेणारी साऊथची अभिनेत्री आहे.