विकी कौशल आणि कतरिना कैफ सात फेरे घेण्यासाठी राजस्थानला रवाना झाले आहेत. जोधपूरला जात असताना दोघेही विमानतळावर दिसून आले आहेत. राजस्थान सवाई माधोपूर येथे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. 7 डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 10 डिसेंबरला रिसेप्शनने लग्नसोहळ्याची सांगता होणार आहे.