भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दुर्गराज रायगडला भेट दिली.



खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचं वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं.



तब्बल 35 वर्षींनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत.



या आधी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 साली किल्ले रायगडावर आल्या होत्या.



इंदिरा गांधींच्या सूचनेनुसार मेघडंबरी 1985 साली बांधून पूर्ण झाल्यावर तिच्या लोकार्पण सोहळ्यास तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह किल्ले रायगडावर आले होते.



या दौऱ्यादरम्यान ते रायगडावर हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे राष्ट्रपतींनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आणि त्यांनी रोपवेने रायगडावर जाण्याचा निर्णय घेतला.



राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. त्यांचं स्वागत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं.



राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आपल्या परिवारासह रायगडवर उपस्थित होते, त्यांनी शिवछत्रपतींना वंदन केलं.



यावेळी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भवानी तलवारीची प्रतिकृती भेट दिली.



(फोटो सौजन्य : दिपक सपाटे, राजघराण्याचे छायाचित्रकार)