असे मानले जाते की ज्या घरात मनी प्लांटचे रोप असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. म्हणूनच बरेच लोक ते घरी लावतात.



वास्तू नियमानुसार त्याची स्थापना किंवा देखभाल न केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. वास्तुनुसार मनी प्लांट ठेवण्याचे काय नियम आहेत हे जाणून घ्या.



मनी प्लांट सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो. त्यामुळे घराबाहेर कधीही लावू नये.



मनी प्लांट नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतच ठेवावा.



एखादी व्यक्ती कितीही खास असली तरी त्याच्यासोबत मनी प्लांटची देवाणघेवाण करू नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.



वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. या दिशेला मनी प्लांट लावल्याने किंवा ठेवल्याने आर्थिक नुकसान होते.



मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा उत्तम मानली जाते. ही दिशा शुभ आहे. कारण ही श्रीगणेशाची दिशा मानली जाते.



तसेच मनी प्लांट नेहमी हिरवागार ठेवावा. मनी प्लांट सुकल्याने अशुभ होऊ शकते.



जर तुमच्या घरी मनी प्लांट असेल, तर त्याला वेळोवेळी पाणी देत ​​राहा. जर मनी प्लांट काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात लावला असेल तर त्याचे पाणी देखील बदलत रहा.



वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कोणालाही भेट देऊ नका. त्यामुळे सुख-समृद्धी कमी होते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)