अभिनेत्री वाणी कपूरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये वाणी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

वाणीने या लूकसाठी लाईट मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत.

या लूकमध्ये वाणी खूपच सुंदर दिसत आहे.

वाणी कपूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

वाणी नेहमी तिचे फोटो किंवा वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

वाणी कपूरने 2013 साली आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटासाठी वाणीला पदार्पण करणाऱ्या उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

वाणी 2021 साली चंदीगढ करे आशिकी या चित्रपटात ट्रांन्सवूमनच्या भूमिकेत झळकली होती.

वाणीने शेअर केलेले फोटो पुरस्कार सोहळ्यातील आहेत.