बहुतेकांना पपई हे फळ फारसं आवडत नाही. पण पपई हे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फार फायदेशीर आहे. पपई हे फळ खाण्यासह त्वचेवर लावण्यासाठी वापरले जाते. पपईचा फेसपॅक लावल्यास त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. पपईमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. पपईच्या मदतीने तुम्ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी चे गुणधर्म त्वचेला देऊ शकता. पपईचा फेसपॅक त्वतेवर लावल्यास त्वचेला चकाकी येते आणि त्वचेसंबंधी समस्या देखील दूर होतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या दूर होते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंगची समस्या दूर होते. पपईमध्ये पपईन असते, जे मुरुमांची समस्या दूर करते. त्वचेच्या कोरडेपणाची समस्या असेल तर पपईने तुम्ही चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करू शकता. जर तुमचा चेहरा सतत तेलकट होत असेल तर दिवसातून एकदा चेहऱ्यावर तुम्ही पपईचा गर लावू शकता, त्यामुळे तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल. पपईचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील छिद्र (Skin Pores) घट्ट होतात. त्यामुळे सतत पिंपल्स येण्याची समस्या देखील दूर होते.