दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा'च्या दुसऱ्या भागात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एन्ट्री झाली आहे.

कांतारा 2 च्या निमित्ताने उर्वशी रौतेला देखील तिचे अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.

उर्वशीने ऋषभ शेट्टीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ती 'कांतारा' अभिनेत्यासोबत हसतमुख पोज देताना दिसत आहे.

उर्वशी रौतेलाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे.

अनेकजण पोस्टवर उर्वशीवर मजेशील कमेंट्स करत आहेत.

अभिनेत्रीच्या पोस्टनंतर युजर्सना पुन्हा एकदा ऋषभ पंतची आठवण झाली.

एका यूजरने लिहिले की दीदी तुमच्या आयुष्यात ऋषभ किती गुंतले आहेत.

उर्वशी रौतेलानेही तिच्या चाहत्यांना आनंदाची बादमी दिली.

पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि डोळ्यावर गॉगल घातलेली उर्वशी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.