बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्ननंतर त्यांचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ-कियाराने लग्नसोहळ्यातील व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला असून या व्हिडीओला काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सिद्धार्थ-कियाराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ-कियाराने लिहिलं आहे,07/02/23. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नसोहळ्यानंतर एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. कियारा-सिद्धार्थचं नुकतचं दिल्लीत रिसेप्शन पार पडलं असून आता मुंबईत देखील एक ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे. लग्नसोहळ्यानंतर आता या ग्रॅंड रिसेप्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.