बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद सेलिब्रिटी बनली आहे.

कोणत्या ना कोणत्या कारणाने उर्फी रोज चर्चेत असते.

उर्फी तिच्या विचित्र फॅशनमुळे ती रोजच हेडलाइन बनते.

उर्फीला नुकतेच हिंदुस्थानी भाऊने धमकीवजा सल्ला दिला आहे.

उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत हिंदुस्थानी भाऊने तिला सल्ला दिलाय.

'उर्फीने कसे पण कपडे घालू नयेत. ती आज स्वतःला एक मोठी फॅशन आयकॉन मानते. यामुळे भगिनी, मुलींमध्ये चुकीचा संदेश जातो. उर्फी सुधर नाहीतर आम्ही तुला सुधरवू, असे हिंदुस्थानी भाऊने म्हटलंय.

हिंदुस्थानी भाऊच्या या धमकीवर उर्फी चांगलीच भडकली आहे.

तुमची भाषा ही भारताची प्रथा आहे का? तुमच्या भाषेने किती लोकांना सुधारला आहे, असे उर्फीने म्हटले आहे.

तू मला उघडपणे धमक्या दिल्यास तर तुला तुरुंगात पाठवेन, असे उर्फीने म्हटले आहे.

उर्फी आणि हिंदुस्थानी भाऊमधील वाद चांगलाच टोकाला गेलाय.