पंढरपूरमधील अनिल नगर भागात राहणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या कृष्णा शिंदेने लॉकडाऊनचा सकारात्मक उपयोग करुन घेतला. (Photo credit : Reporter/Pandharpur)



या काळात कृष्णाने संपूर्ण गीता मुखोदगत करून दाखवली आहे. (Photo credit : Freepik)



एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर इवल्याशा कृष्णाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याची संधी मिळवली आहे. (Photo credit : Freepik)



कोरोना काळामध्ये सगळीकडेच लॉकडाऊन होता. (Photo credit : Freepik)



संपूर्ण जग या काळात ठप्प झालेलं होतं. (Photo credit : Freepik)



या दोन वर्षाच्या काळात त्या वेळी नऊ वर्ष वयाच्या कृष्णाने मोबाईल तसेच धार्मिक ग्रंथातून गीतेचे तब्बल सातशे श्लोक मुखोदगत केले होते. (Photo credit : Freepik)



कृष्णाने हे सर्व श्लोक केवळ 55 मिनिट आणि 51 सेकंदामध्ये म्हणत एक विक्रम केला आहे. (Photo credit : Reporter/Pandharpur)



कृष्णाच्या घरची परिस्थिती हलाखिची असून विठ्ठल मंदिरामध्ये त्याची आई देवाला नैवेद्य बनवण्याची सेवा करते, तर वडील मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढतात. (Photo credit : Freepik)



अशात कृष्णाने कोरोना काळात मोबाईलवर लर्न गीता डॉट कॉम या संकेत स्थळावर जावून गीतेच्या श्लोकाचं शिक्षण घेतलं. (Photo credit : Freepik)



लॉकडाऊन काळात कृष्णाने गीता शिकण्याचं काम केलं आणि आज केवळ 55 मिनिटांत तो संपूर्ण 700 श्लोक म्हणून दाखवतो. (Photo credit : Freepik)