आवडत्या कपड्यांवरचे हळदीचे डाग कसे काढायचे?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

अनेकदा जेवण करताना किंवा कार्यक्रमात, समारंभात तुमच्या आवडत्या कपड्यांवर हळदीचे डाग लागतात.

Image Source: Pexels

हे डाग खूप गडद असतात, कारण त्यामध्ये तेल आणि इतर मसालेही असतात.

Image Source: Pexels

हे डाग सहजासहजी जात नाहीत. चला, ते कसे काढायचे...

Image Source: Pexels

सर्वात आधी डाग लागलेल्या कपडा पाणी न लावता ब्रशनं स्वच्छ करा...

Image Source: Pexels

ब्रशनं व्यवस्थित कपड्यावरचे हळदीचे कण काढा.

Image Source: Pexels

त्यानंतर डागांवर डिटर्जंटचे 4-5 थेंब टाका आणि बोटांनी घासून घ्या.

Image Source: Pexels

तुम्ही हळदीच्या डागावर थेट लिंबाचा रस टाकून 30 मिनिटं तसाच ठेवा.

Image Source: Pexels

तुम्ही बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून डागावर लावू शकता.

Image Source: Pexels

हे सर्व केल्यानंतर, कपडे धुवा.

Image Source: Pexels

सूर्यप्रकाशही हळदीचा डाग घालवतो, म्हणून कपडे उन्हात वाळवा.

Image Source: Pexels