हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी योग्य जीवनशैलीसोबतच आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. ‘या’ 5 गोष्टींमुळे तुमचे ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहील.



सर्व फळे जरी आरोग्यासाठी चांगली असली, तरी हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायबर युक्त फळांचे सेवन करावे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.



हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. जेवणात पालक हिरव्या भाज्या अवश्य खाव्यात. त्यात ल्युटीन आणि कॅरोटीनोइड्स असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.



आहारात तृणधान्यांचे सेवन अधिकधिक करावे. हे भरपूर फायबर प्रदान करते आणि शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी करते. यासाठी, तुम्ही ओट्स खाऊ शकता.



सर्व कडधान्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर जास्त असते. जेवणात कडधान्ये नियमित खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.



अक्रोड हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-३, कॉपर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. जे तुमचे हृदय निरोगी आणि मजबूत बनवतात.



Thanks for Reading. UP NEXT

16 एप्रिल-काय सांगतंय आजचं राशीभविष्य?

View next story