जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील ही नयनरम्य दृश्य.



गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे.



त्यामुळे अजिंठा लेणीतील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत.



या धबधब्यांमुळे लेणीचं सौंदर्य अधिकच खुलून जात आहे.



जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील वाघूर नदीचे उगमस्थान असलेला धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.



यामुळे वाघूर नदीला मोठा पूर आला आहे.



या निसर्गसौंदर्याने मोहिनी घातल्याने पर्यटकांची पावले भर पावसातही अजिंठा लेणीकडे वळू लागली आहेत.



औरंगाबादमध्ये सर्वत्र पावसाना हजेरी लावली आहे.



फेसाळणारे धबधबे, आजूबाजूची हिरवळ पाहून इथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनाला भुरळ पडत आहे.