बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते.



आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत.



राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटीश वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.



अभिनेत्रीने तिचं लग्न सुरुवातीला सिक्रेट ठेवलं. मात्र, काही काळानंतर तिने याची जाहीर कबुलीही दिली होती.



आता तिने आपल्या लग्नाबद्दल एक खुलासा केला. राधिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिच्याकडे तिच्या लग्नाचा एकही फोटो नाही. यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.



अभिनेत्री राधिका म्हणाली की, 10 वर्षांपूर्वी माझे आणि बेनेडिक्टचे लग्न झाले, तेव्हा या लग्नाचे फोटो क्लिक करायला आम्ही विसरलो.



आमचे लग्न ‘डू इट युवरसेल्फ’ होते. आम्हीच आमच्या मित्रांना घरी बोलावून, स्वतः लग्नाचे जेवण बनवले होते. इंग्लंडमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आणि यानंतर पार्टीही केली.



पण, आमचे अर्ध्याहून अधिक मित्र फोटोग्राफर असूनही, आम्ही या लग्नात कोणतेही फोटो क्लिक केले नाहीत. त्यामुळे आता या लग्नाचा एकही फोटो नाही.



याचं नेमकं कारण सांगताना राधिका म्हणाली की, यावेळी आम्ही सगळेच नशेत होतो. अर्थात यात मी आणि बेनेडिक्टही सामील होतो.



Thanks for Reading. UP NEXT

मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस

View next story