सध्या नागिन या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
नागिन ही मालिका हिट झाल्यानंतर तेजस्वीनं ऑडी क्यू 7 (Audi Q7) ही आलिशान गाडी घेतली आहे.
गुढीपाडव्याला तेजस्वीनं ऑडी क्यू 7 आलिशान गाडी घेतली आहे.
शूटिंगमध्ये तेजस्वी बिझी होती, त्यामुळे तीन दिवसानंतर ती ही कार घरी घेऊन जाण्यासाठी शोरूममध्ये गेली.
कारची डिलेव्हरी घेण्यासाठी तेजस्वीसोबतच करण कुंद्रा देखील गेला होता.
तेजस्वी शोरूममध्ये पूजा केली, त्यानंतर गाडी समोर नारळ फोडून ती ही घरी घेऊन गेली.
तेजस्वीनं खरेदी केलेल्या गाडीची किंमत जवळपास एक कोटी आहे.
'खतरों के खिलाडी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विथ कपिल' आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता.