मोबाइल चोरी झाल्यास काय करावे?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

आजकाल मोबाइल फक्त एकमेकांशी कनेक्ट होण्याचं साधन नाही

Image Source: Pexels

यामध्ये अनेक आवश्यक कागदपत्रे, खाजगी छायाचित्रे आणि ऑनलाइन बँकिंगची माहिती असते.

Image Source: Pexels

अशा परिस्थितीत, जर तुमचा मोबाईल चोरीला गेला, तर तुमचा सर्व डेटा, बँक डिटेल्स, सगळे काही गमावून बसता.

Image Source: Pexels

तथापि, केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीने तुमचा चोरी झालेला मोबाईल मिळू शकतो.

Image Source: Pexels

सर्वात आधी, तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीची एफआयआर (FIR) दाखल करा.

Image Source: Pexels

तक्रार दाखल झाल्यावर तुम्हाला एक तक्रार क्रमांक मिळेल.

Image Source: Pexels

ज्याच्या मदतीने CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवणे सोपे होईल

Image Source: pexels

या पोर्टलवर प्रवेश करताच ब्लॉक किंवा चोरी झालेल्या मोबाईलसाठी असलेल्या पर्यायावर क्लिक करा.

Image Source: Pexels

मग येथे तुमच्या मोबाईलशी संबंधित सर्व माहिती भरा.

Image Source: Pexels

त्यानंतर, तुमच्या एफआयआरची प्रत, मोबाईलची माहिती, चोरीची वेळ आणि ठिकाण यासारखी माहिती भरून सबमिट करा.

Image Source: Pexels