लोक गर्दीत किंवा रांगेत उभे राहून वारंवार डिझेल भरण्याऐवजी, एकदाच गाडीची टाकी पूर्ण भरतात किंवा डिझेलचा साठा करतात, पण कधीकधी ही समस्या निर्माण होते.
अनेकदा तुम्ही रोजच्या वापरातील किंवा खाण्याच्या वस्तूंची एक्सपायरी डेट पाहून खरेदी करता, पण डिझेल भरताना किंवा साठवताना विचार केला आहे का की डिझेलचीही एक्सपायरी डेट असते
जर तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल, तर पाहा डिझेलची एक्सपायरी डेट किती असते.
सर्वसाधारणपणे डिझेलची लाईफ सुमारे 6 महिने ते 1 वर्षापर्यंत असते, त्यानंतर ते वापरण्यायोग्य राहत नाही.
खरं तर, डिझेल जास्त काळ साठवून ठेवल्यास त्यात ओलावा येऊ लागतो, ज्यामुळे डिझेलमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीचा धोका वाढतो.
जर जास्त जुने झाले, की त्यांची रासायनिक गुणवत्ता घटते, तसेच इंधनाचा रंग बदलतो आणि वासही येऊ लागतो.
डिझेलला हवा, सूर्यप्रकाश, उष्णता आणि ओलाव्याच्या संपर्कात येण्यापासून वाचवले, तर त्याचे आयुष्य वाढते.
खराब डिझेल वापरल्यास वाहनाचे इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो, तसेच इंजेक्टर आणि इंधन पंप निकामी होण्याची भीती असते
गाडीला फ्युएल फिल्टर जाम होणे, धूर जास्त येणे यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी टाकीमध्ये डिझेल भरून जास्त वेळ उभी करू नये.