Tata Nexon EV च्या सर्व व्हेरिएंटच्या किंमतीत कंपनीने वाढ केली आहे. Nexon EV पाच प्रकारांमध्ये भारतात उपलब्ध आहे. ही कार 14.29 लाख रुपयांऐवजी 14.54 लाख रुपयांना उपलब्ध आहे. देशात विकल्या जाणाऱ्या EV कारमध्ये 95 टक्के या टाटाच्या कार आहेत. Tata Nexon EV एका चार्जमध्ये 312 किमीचा पल्ला गाठते. डीसी फास्ट चार्जरने ही कार एका तासात 80 टक्के चार्ज होते.