डुकाटी इंडियाने अभिनेता रणवीर सिंहला आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. Ducati India ने भारतीय बाजारपेठेत 25.91 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत आपली नवीन बाईक Diavel V4 लॉन्च केली आहे तर, Ducati Diavel V4ची डिलिव्हरी लवकरच नवी दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, अहमदाबाद आणि चंदीगड येथील सर्व डुकाटी स्टोअर्सवर सुरू होईल असे कंपनीने सांगितलं आहे. Ducati Diavel V4 दोन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहेत. Ducati Red आणि Thrilling Black. बाईकची रचना पॉवर क्रूझर म्हणून केली गेली आहे. ज्यामध्ये 20 लीटर इंधन, एक फ्लॅट हेडलॅम्प, सिंगल-साईड स्विंगआर्म आणि साईड-माउंट एक्झॉस्ट ठेवता येईल. खरंतर, Diavel V4 त्याच्या डिझाईनसाठी खूप प्रसिद्ध आहे. Ducati Diavel V4 मध्ये 1,158cc V4 GranTurismo इंजिन आहे हे 10,750rpm वर 165bhp आणि 7,500rpm वर 126Nm चे पीक टॉर्क आउटपुट जनरेट करते.