सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या लोणावळा-खंडाळ्याचं रुपडं पावसामुळे अक्षरशः पालटून गेलं आहे.



बहरुन गेलेल्या निसर्गाचं मनमोहक दृश्य इथं अनुभवायला मिळत आहे.



घाट माथ्यावरील हिरवीगार घनदाट झाडी, त्यावर धुक्याची चादर आणि यातून वाट काढत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात आहेत.



नटलेला हा निसर्ग पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सकाळ प्रफुल्लित करतोय.



सध्या पर्यटन बंदी असल्याने पर्यटकांना हा आनंद घेता येणार नाही. त्यामुळेच एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्ये.



गेल्या 24 तासात 227 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चार दिवसांत 890 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे.



आतापर्यंतचा 2 हजार 196 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत अवघा 1 हजार 374 मिलिमीटर इतकाच झाला होता.



नागरिकही ही निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत



निसर्गाचं हे सौंदर्य पाहून सगळ्यांच्याच डोळ्याचंं पारणं फिटत आहे