2023 हे वर्ष अभिनेत्री 'सनी लिओनी' साठी अनेक कारणांनी खास ठरलं आहे. सनीच्या 'कॅनेडी'या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'स्टँडिंग ओव्हेशन' मिळालं. तसेच तिने या वर्षी तिच्या व्यवसायाची नवी सुरुवात केली. मेरा पिया घर आया 2.0' आणि 'थर्ड पार्टी' या तिच्या म्युझिक व्हिडीओवर लाखो व्ह्यूज मिळाले. विशेष म्हणजे तिच्या 'लैला' या गाण्याला 1 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. मनोरंजन कारकिर्दीच्या पलीकडे सनीने पती डॅनिअल वेबर सोबत स्टार स्ट्रक बाय सनी लिओन या कॉस्मेटिक ब्रँडचा विस्तार केला. राइज एनर्जी बार आणि स्लीप एड कंपनीमध्ये गुंतवणूक केली. 'स्प्लिट्सव्हिला' या टेलिव्हिजन शोचा ती भाग झाली. सनी लिओनीचे 2024 मध्ये अनेक नवनवीन प्रोजेक्ट येणार असून ती 'ग्लॅम फेम' आणि अनुराग कश्यपच्या 'कॅनेडी' मध्ये दिसणार आहे. सनी लिओनीचा पहिला तमिळ चित्रपट 'कोटेशन गँग' असणार आहे. सर्व फोटोंचे क्रेडिट (Photo credit : Instagram/@sunnyleone)