सध्या मराठी सिनेसृष्टीत सेलिब्रिटीच्या लग्नसोहळ्यांची रेलचेल सुरु आहे.



अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी यांनी 25 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली.



सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



या जोडीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असल्याचं पाहायला मिळतंय.



स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी..



स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे.



दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



स्वानंदीचा पती आशिष कुलकर्णी यांने 'इंडियन आयडॉल 12' गाजवलं आहे.



2008 साली 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात आशिष सहभागी झाला होता.



त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे.