बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा आज 61 वा वाढदिवस आहे.
सुनीलचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकमध्ये झाला.
सुनीलचं पूर्ण नाव सुनील वीरप्पा शेट्टी असं आहे.
सुनीलनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सुनील त्याच्या फिटनेसनं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील खास गोष्टी...
सुनीलनं 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या बलवान या चित्रपटामधून करिअरला सुरुवात केली.
1994 मध्ये रिलीज झालेला 'मोहरा' हा सुनीलचा पहिला हिट चित्रपट ठरला.
1994 मध्येच दिलवाले चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामधील अभिनयासाठी सुनीलला अनेक पुरस्कार मिळाले.
सुनील हा अभिनेता असला तरी तो बिझनेसमॅन देखील आहे. सुनीलची हाउस पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. तसेच त्याचे स्वत:चे एक हॉटेल देखील आहे.