21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून देणाऱ्या हरनाज संधूच्या चर्चा आज जगभर रंगत आहेत. तिने आपल्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. आज लोक तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत. हरनाज अलीकडच्या काळात सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. तीसुद्धा अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करून हृदयाचे ठोके वाढवत असते. आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये हरनाज इतकी ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. ताज्या फोटोंमध्ये हरनाजने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तिने ग्लॉसी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे आणि केस बांधले आहेत. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.