'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या सिनेमांनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने आगामी 'सुभेदार' या सिनेमाची घोषणा केली.

घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

आता या सिनेमातील 'मावळं जागं झालं रं...' हे पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकरने 'मावळं जागं झालं रं' या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,18 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा...

सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्येर शिवाजी राजं...

सादर आहे 'सुभेदार'मधील पहिलंवहिलं आपल्या सर्वांचं गाणं 'मावळं जागं झालं रं

चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या 'सुभेदार' सिनेमातील गाण्यावर

शिवराज अष्टकातील कोणतही गाणं ऐकलं की अंगावर शहारे येतात