५ एप्रिलनंतर पहिल्यांदाच निर्देशांक ६० हजारांच्या टप्प्यात
सेन्सेक्स १७३ अंकांनी वधारत ६० हजार ०१४ वर
निफ्टी ४८ अंकांनी वधारत निर्देशांक १७ हजार ८७४ अंकांवर
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, भारतातील किरकोळ घाऊक महागाई दरातील घसरणीमुळे बाजार वधारला
ग्रासिम इंडस्ट्रीज, NTPC, आयशर मोटर्स, हिरो मोटोकाॅर्प, BPL कंपन्यांचे समभाग वधारले
डाॅलरच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी मजबूत, ७९.२७ प्रति डाॅलरवर उघडला
मंदीच्या शक्यतेनं कच्च्या तेलाच्या किंमती आणि सोन्याच्या किंमतीत घसरण
कच्चं तेल ९२ डाॅलर प्रति बॅरलवर
मंगळवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजार सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली होती
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 133अंकांची वाढ नोंदवण्यात आली