सलग दोन सत्रांच्या तेजीनंतर शेअर बाजारात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचं दिसून आलं.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 187 अंकांची घसरण झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टीमध्ये (Nifty) 57 अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये आज 0.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,858 वर घसरला.
निफ्टीमध्ये आज 0.32 अंकांची घसरण होऊन तो 18,107 वर घसरला.
आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1549 शेअर्समध्ये वाढ झाली.
1867 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 117 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Asian Paints, Tata Motors, IndusInd Bank आणि Kotak Mahindra Bank कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
ONGC, SBI Life Insurance आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही काहीशी घसरण झाली