पश्चिमेकडील अस्थिर परिस्थितीमुळे शेअर बाजार कोसळला

सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण

आशियाई बाजारातील पडझडीचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम

पश्चिमेकडील अस्थिर भू-राजकीय परिस्थितीमुळे शेअर बाजारात पडझड

अमेरीकन बॉन्ड यील्डमुळे फेडकडून व्याजदरात कोणतीही कपात करण्याचं चिन्ह नसल्यानं अमेरीकन बाजारात पडझड

याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर, मागील 5 सत्रात घसरणीचा सिलसिला सुरुच

सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला तर निफ्टीतही 252 अंकांची घसरण

निफ्टी निर्देशांक घसरुन 19 हजारांच्या खाली

28 जूननंतर पहिल्यांदाच निफ्टी 19 हजारांच्या खाली

मागील तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच

आशियाई बाजारातील खराब सुरुवातीनंतर भारतीय बाजारात देखील घसरण

आयटी कंपन्यांचे शेअर्स गडगडले, टेक महिंद्रांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण

अदानी समुहातील सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण

आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे आतापर्यंत जवळपास 3.5 लाख कोटींचे नुकसान

भारतीय शेअर बाजारात शेअर्सच्या विक्रीचा सपाटा